Ad will apear here
Next
‘तिच्या’ हाती ‘गगनयाना’ची चावी
इस्रोमधील डॉ. ललिथंबिका लवकरच करणार मोहिमेची आखणी
डॉ. ललीथंबिका१५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या मानवी अवकाश मोहिमेची म्हणजेच ‘गगनयान मोहिमे’ची अधिकृत घोषणा केली होती. त्यानुसार आता या मोहिमेची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीचे नावही निश्चित करण्यात आले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे ही जबाबदारी एका महिला वैज्ञानिकाकडे देण्यात आली आहे. मागील ३० वर्षांपासून इस्रोमध्ये रॉकेट इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या महिला वैज्ञानिक या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे नैतृत्व करणार आहेत. अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठवण्याची ही ‘गगनयान मोहीम’ अवकाश तंत्रज्ञान विश्वातील भारतासाठी एक मोठे यश ठरणार आहे. 

काय आहे हे गगनयान ?
- भारतातून अंतराळवीराला अवकाशात घेऊन जाणारी ‘गगनयान’ ही पहिली मोहीम असेल.
- इस्रो या मोहिमेवर काम करत आहे.
- यासाठी पाच जुलै २०१८ला इस्रोतर्फे पहिली ‘पॅड अबॉर्ट टेस्ट’ करण्यात आली होती. 
- श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ही चाचणी करण्यात आली होती. 
- या ‘पॅड अबॉर्ट टेस्ट’मध्ये ‘क्रू एस्केप सिस्टिम’ नावाच्या एका प्रणालीच्या तांत्रिक बाबींचे परीक्षण केले जाते. 
- अवकाशयानातील अंतराळवीरांच्या केबिनला ‘लॉंच व्हेइकल’पासून सुरक्षितपणे वेगळे करण्याचे काम हे तंत्रज्ञान करते. 
- आपत्कालीन स्थितीत या पॅडचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो.  

‘गगनयान’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात अनेक विषयांचे तज्ज्ञ, विविध संघटना आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींचा सहभाग असेल. या मोहिमेत पाठवण्यात येणारे अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असून या प्रकल्पासाठी होणारा खर्च साधारण १० हजार कोटींच्या जवळपास असेल. या मोहिमेपूर्वी ‘जीएसएलव्ही – ३’च्या आधारे दोन मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. ललिथंबिका लवकरच आपल्या टीमची निवड करतील आणि त्यानंतर मोहिमेची आखणी करण्यात येणार आहे. ही एक अतिशय मोठी जबाबदारी असून डॉ. ललिथंबिका ती पेलण्यास योग्य आणि सक्षम असल्याचे मत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी व्यक्त केले आहे. 

गगनयान मोहिमेमुळे देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान उच्चतम पातळीला पोहोचेल आणि देशाची प्रतिष्ठा वाढेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकल्पामुळे येत्या काळात देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची निर्मिती होईल असेही सांगितले जात आहे. येत्या काळात नोकऱ्यांच्या १५ हजार संधी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZNZBR
Similar Posts
भारताचे ‘शक्तिशाली’ उड्डाण श्रीहरिकोटा : सोमवारचा दिवस हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’साठी आणि एकंदरच अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. भारताच्या आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली ‘जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल मार्क थ्री’ (जीएसएलव्ही एमके-३) या उपग्रह प्रक्षेपकाचे सोमवारी श्रीहरिकोटा
डोनाल्ड ट्रम्प, कडून मोदींना अमेरिका भेटीसाठी आमंत्रण! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा झाली. भारत हा खरा मित्र असल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले आहे. तर मोदींनीही ट्रम्प यांना भारत दौ-यासाठी
राजनाथसिंह नवे संरक्षणमंत्री; अमित शहांकडे गृहखाते; खातेवाटप जाहीर नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१९ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपतिभवनात झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांच्यासह एकूण ५८ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळाचे खातेवाटप ३१ मे २०१९ रोजी जाहीर झाले आहे. राजनाथसिंह यांच्याकडे
प्रिय नरेंद्र मोदीजी... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. या निमित्ताने ‘किमया’ सदरात आज, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेले हे खुले पत्र...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language